Tuesday 26 January 2016

गायत्रीमंत्र सर्वाक्षर महिमा ~~~~~~~~~~~~~ ''ॐ'' या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. ''भू:'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. ''भूव:'' च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो. ''स्व:'' या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो. ''तत्'' च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सूप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते. ''स'' च्या उच्चाराने डाव्या डोळयातील सफलता नांवाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते. ''वि'' चे उच्चारण केले असता डाव्या डोळयामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते. ''तु'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नांवाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते. ''र्व'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिध्द होते. 'रे'' चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तिची जागृती होते. ''णि'' च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते. ''यं'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिध्दि होते. ''भर'' या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठत असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते. ''गो'' चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुध्दि' शक्तीची सिध्दि होते. ''दे'' च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते. ''व'' चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिध्दि करतो. ''स्य'' याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगडया जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते. ''धी'' च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ति ' सिध्द होते. ''म'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तिची जागृती होते. ''हि'' च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिध्द होते. ''धी'' या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिध्दि होते. ''यो'' च्या उच्चारणाने डाव्या भूजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्निहित' शक्ति जागृत होते. ''यो'' च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते. ''न:'' या अक्षराच्या उच्चारणांने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारीणी' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिध्दि होते. ''प्र'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते. ''चो'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिध्दि होते. ''द'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नांवाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते. ''यात्'' या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिध्द होते. ~~~~~~ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

No comments:

Post a Comment