Sunday, 12 April 2015

सद्गुरु माया मच्छींद्रनाथ


gorakhnath


jalandernath


दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ १] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.. २] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’ ३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’ ******************************* दत्ताच्या परिवाराचा भावार्थ ४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.… ५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत.… ६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व अधिक आहे.… ७] मूर्तीविज्ञान दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे आहे ८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.… ९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.… १०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.… ११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

संजीवनी मंत्र gorakshanath gahininath

---संजीवनी मंत्र -- भगवान गोरक्षनाथ जो मत्र म्हणत असतांना, चिखलाच्या पुतळ्यापासून गहिनीनाथांचा जन्म झाला. " ॐ कर्मराणं स्वःमि गृते चतकार्यः कदया स्फुट -ही स्वः अस्वः स्तीनमर्यम् सप्तम् ऋणीनामं भुः वः नदनं आम कार्मा भुः यः कर्मकणग्रे पदीनम फुटम् कर्मेणम् जमस्वी होत कारंम् भिभीना स्वः किदलां हरम् तेहतीस आर्जाजम् गण गुढाणाम् गमनम आजानम् पदवः बृहस्पतीनम् पिरायंम् अदयस्ते मानम् पदयस्तम् चर्णम् गायत्री पवनम् पदम् कोरंम् हुःदूः कुंम मृतर्व शूर्कजनम् गुपम् गुखम् देवस्ती देवम् दानवस्ती दानंम् हेलस्ती हेलम् अदम् गुरून गुरं कांजनम् नमनंम स्वःस्तीना खार्ट सटंम् जट् वट् जम जन जमनः हिं गोत्रा नाखाडम् खुय्ययः फुर फाठ खट मट वार्ज वेन नेमलते देवनंम् नमस्ते जाटंम् विजयम् गद्नन् गद् म् गोढायः गदन् गद् म् जमुनाय गदन् गद्म सरस्वती फुसा ॐ धुरा सननम् पेरवा ह्रदमंमं ह्रदमंमं जयस्वः कुरंम् फुस्वाः भुवः मतकारेः ।" ---+++++-------- संदर्भ -- गोरखनाथ योग सिध्दी साधना । । जय शिव गोरक्ष ।।

Saturday, 11 April 2015

जय शंकर महाराज

जय शंकर महाराज शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायकराजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. ( वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे. ) समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले. आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व - शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १ ९ ६ ६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १ ९ ८ ९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले.

अहंकार

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका. 👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे. 🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही. ✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले. ✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली. ✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला. ✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला. ✨ दिला संसार चालवायला देवी-देवतांना पण मोक्ष काढून घेतला. 👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर देवाने तुझ्या माझ्या सारख्या किती झनांना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.