Saturday, 11 April 2015
अहंकार
🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
✨ दिला संसार चालवायला देवी-देवतांना पण मोक्ष काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर देवाने तुझ्या माझ्या सारख्या किती झनांना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment