Saturday, 11 April 2015
सद्गुरू
सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात , चांगल्या, वाईट.आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची.आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते , संत देखील
आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय.ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते.प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात , तर ज्याला इच्छा असते त्यावर.ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजरी” माणसा कडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर ?
म्हणूनच जो जागा होतो,शरणागत होतो , ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही.जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा” “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते.आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून,कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.त्याची उतराई त्यांची किती हि जन्म सेवा केली तरी हि होऊ शकत नाही.
कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही.ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान , त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देह असले तरी ते देहातीत असतात,”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही.आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वा पर्यंत पोहोचायचे आहे.आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग,किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे.महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता , त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस , मी तुझे सारथ्य करतो,म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
सदगुरूंची करुणा,प्रेम,पाठराखण ज्यांना अनुभवायची आहे त्यांच्या साठी मी आज मी म्हणेन
“हँव अ सदगुरू अनुग्रह डे ”
इदं न मम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment