Saturday 11 April 2015

गोरक्ष नाथ भुक

देव भूकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धिचा ?एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले.एका घरासमोर उभे राहून "अल्लख निरंजन" असे म्हणताचघरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथम्हणाले "बाई शेरभर तरी पीठ दे ग". त्यावरबाई रागावली वत्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतुकुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांचीटवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हेपाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथगोरक्षांना म्हणाले "गोरख आता जगाला आपली गरजराहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्रहोते." नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथम्हणाले "गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊकआहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणचबदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्हीतिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवेआहे ते?" ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठयाचौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्यामध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेतभिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतःकाठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हेपाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळेघेऊन लोकांनीत्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथेआले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवेआहे. चमत्कार तिथे नमस्कार. सांगायचे तात्पर्य इतकेच कीत्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीचलागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमजकरुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीताझाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणेहाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीतश्रद्धा असते ते पहा? ज्याचे मठ मोठे तो खरा संत, ज्याचेभक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वरयांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणेम्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजेचमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेचदेवाच्या बाबतीतही घडले. "प्रतिमेची पूजा करीता करीता. तोस्वतः पाषाण झाला. मानवाचा छंद सारा. देवाचा बाजारझाला." अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्यामूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्यासमुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दीवाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन कायघेतात? अरेरे... असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षानास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे कीकलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचेमहत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक(जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्यानावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्याश्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोषलोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असतानाभोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करुनये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाचत्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आताकुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रहम्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदूकारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहाना. ईश्वराकडे जाण्यासाठी "मूर्तिपूजा" हा एक रामबाणउपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्यसहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचलअसते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मनस्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तरसमोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा. मुर्तिपूजा हेअज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे.प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत.ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीरकिंवा मंत्रयुक्ततसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंनामूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधनआहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झालेकाय? लोकमूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणिआपला "आधूनिक देव" प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आजहिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोगशुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांचीबाजार. काही लोक तर देवस्थानाला "पिकनिक पॉइंट" म्हणूनभेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहेका? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंधविश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळीदौलत त्याचीचआहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे.ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा.एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रहआहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्यानेव्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र.भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांतछोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागातअसलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपणराहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्यात आपलेस्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेलाकसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणीकसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तोआपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा कायसाक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावतनाही असेनाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणूनतर आपणजगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठीयोग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तोआपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावेलागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखालीजातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंडपाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडेजावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हामायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेलतर आपल्यालात्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढलीतर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्याभेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धाडोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणेविपरीत श्रद्धाघडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतुत्याचा नकळतअपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताचीकृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असेसमजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपणनेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मीत्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होतनाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते.तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवतानाकचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते.काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतकेविक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतातआणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवारबाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरावैज्ञानिकईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपेअसते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो,ज्याचे त्याचे कर्म.ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संतहे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंतपोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीतनाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंतसंतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कारवाचावयासमिळतात. मग ते खोटे हे असे समजावे का? नाही मुळीच नाही.योगी अरविंद म्हणतात "परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जेतर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीनेचमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिलेनसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठीचमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनीअनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणूनआपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजेकाय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिकआहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्यवृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो.हा वारा दिसतनाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांनाजगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिकआहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्याव्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईलकी तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊनभक्तिभावाने उभे राहिले पाहिजे. आचारः परमो धर्म. आचारशुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाणटाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवानभक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्याचरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांतश्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीतघेईल. कारण देव श्रद्धेचाभूकेला आहे, प्रसिद्धिचा नव्हे.देव देव म्हणोनी I व्यर्थ का फिरसी Iनिज देव नेणसी I मुळी कोण ? IIदेवा नाही रुप I देवा नाही नांव Iदेवा नाही गाव I कोठे काही IIज्ञानदेव म्हणे I भजा आत्मदेवा Iअखंडित सेवा I करा त्याची

No comments:

Post a Comment